Skip to content
jyoti joshi banner slider (6)
jyoti joshi banner slider (7)
jyoti joshi banner slider (5)
previous arrow
next arrow

ज्योतिषशास्त्र शिका मोफत व ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा →

परीक्षेसाठी क्लिक करा →

Astroguru Dr. Jyoti Joshi

एस्ट्रोगुरु डॉ ज्योति जोशी यांच्या बद्दल

ज्योतिषशास्त्र ही आपल्या संस्कृतीने संपूर्ण जगाला दिलेली देणगी आहे. आपल्या ऋषी मुनींनी कठोर परिश्रमातून केलेल्या संशोधनाचे ते फळ आहे. त्याची महती इतकी प्रचंड आहे की, आज हजारो वर्षांनंतरही ते जसेच्या तसे लागू होते. ज्योतिषशास्त्राची निर्मिती मनुष्याच्या कल्याणासाठी करण्यात आलेली आहे. ज्योतिषशास्त्राच्या साहाय्याने मनुष्याचे जीवन सुखद, सुखकर होऊ शकते. अशा या ज्योतिषशास्त्राची श्री वैदिक ज्योतिष संशोधन केंद्राच्या माध्यमातून डॉ.सौ. ज्योती जोशी गत 22 वर्षांपासून सेवा करीत आहेत.

ऍस्ट्रोगुरु डॉ. ज्योति जोशी यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक जातकांच्या पारिवारीक, वैयक्तिक, व्यावसायिक, सामाजिक समस्या सोडविल्या आहेत. ज्योतिषशास्त्र हे फक्त भविष्य वर्तविणारे शास्त्र अजिबात नाही. ज्योतिषी भाग्य बदलवू शकत नाही. भाग्यात जे लिहिलंय ते अटळ आहे. त्याला कोणीही टाळू शकत नाही. मात्र त्याच्या आधाराने ज्योतिषी जातकाचं आयुष्य अधिक सुखकर नक्कीच करु शकतो. संकट काळात त्याला सावध करुन संकटांची दाहकता कमी करुन शकतो. तसेच प्रगतीचा काळ असेल तर मिळणाऱ्या संधीचा लाभ अधिक चांगल्या पद्धतीने घेण्यासाठी सजग करु शकतो, यावर त्यांचा विश्वास आहे आणि तेवढा त्यांचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास देखील आहे.

0 + वर्षे

एकूण अनुभव

0 +

संतुष्ट जातक

0 +

प्राप्त पुरस्कार

0 +

एकूण विद्यार्थी

तुमच्या आयुष्यातल्या प्रश्नांवर आजच मार्गदर्शन मिळवा. (आपली वैयक्तिक माहिती संपूर्णपणे सुरक्षित आहे)

आमच्या मुख्य सेवा

ज्योतिषी भाग्य बदलवू शकत नाही. भाग्यात जे लिहिलंय ते अटळ आहे. मात्र त्याच्या आधाराने ज्योतिषी जातकाचं आयुष्य अधिक सुखकर नक्कीच करु शकतो.
आम्ही ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून मागच्या 22 वर्षापासुन लोकांचे आयुष्य सुखद व सुखकर बनवत आहोत.

ज्योतिषशास्त्राचे कोर्सेस

आम्ही ज्योतिषशास्त्राचे ऑनलाइन व क्लासरुममधील अध्ययन वर्ग घेतो. आजपर्यंत ३०००+ हून अधिक विद्यार्थ्यांना आम्ही ज्योतिषशास्त्र शिकवले असून त्यातील २०००+ अधिक विद्यार्थी स्व:तच्या पायावर उभे आहेत व उत्तम प्रकारे कन्सल्टन्सी करत आहेत.

ऑनलाईन सल्लामसलत

आम्ही या नव्या युगातील तंत्रज्ञानाचा उपयोग करुन ज्योतिषशास्त्राची सेवा करीत आहोत. त्यानुसार आम्ही ऑनलाईन मार्गदर्शनही करीत असतो. वेबसाईटवर तशी सुविधा आम्ही उपलब्ध केली आहे.

आरोग्य

कोणत्याही आजारचा संबंध फक्त आपल्याशी नव्हे तर आपल्या पत्रिकेतील ग्रहांशी सुद्धा असतो. झालेले आजार आणि भविष्यात होणारे आजार सुद्धा पत्रिकेतील ग्रह स्थितीवरुन ओळखता येऊ शकतात.

वास्तुयोग

आयुष्यातील इतर सुखांबरोबर वास्तुसुखासाठी सुद्धा आपल्या पत्रिकेतील ग्रहच कारणीभुत असतात. ज्यांच्या पत्रिकेत वास्तुयोग असतो त्यांनाच स्वतःच्या वास्तुचे सुख प्राप्त होत असते.

विवाहयोग

मनुष्याच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत त्याच्यावर अनेक प्रकारचे संस्कार केले जातात. त्यापैकी एक महत्त्वाचा संस्कार म्हणजे विवाह होय. असे म्हणतात की, लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. आम्ही म्हणतो लग्नाच्या गाठी पत्रिकेतील ग्रहांवरुन कळतात.

शिक्षणासाठी ज्योतिषशास्त्र

पालक सदैव मुलांच्या शिक्षणासाठी चिंतेत असतात. कारण त्याचा संबंध भविष्याशी असतो. मात्र चिंता न करता वेळीच पाल्याची पत्रिका ज्योतिषीला दाखविली तर पत्रिकेत असणाऱ्या ग्रह स्थितीवरुन योग्य ते शिक्षण घेता येऊ शकते.

नोकरी योग

काहींना किंवा सर्वांनाच कुठली ना कुठली नोकरी कधीतरी मिळेलच. मात्र ती कधी मिळेल, कशी मिळेल? कुठे मिळेल? हे अगदी ते सुद्धा स्वतः सांगू शकणार नाहीत. मात्र त्यांच्या पत्रिकेतील ग्रह स्थितीवरुन ते सांगता येऊ शकते.

व्यवसाय योग

स्वतःचा व्यवसाय सुरु करणे, त्याला व्यवस्थित सांभाळणे, वाढविणे ही प्रत्येकाला जमणारी गोष्ट नक्कीच नाही. जातकासाठी नोकरी चांगली आहे की व्यवसाय? हे त्या जातकाच्या पत्रिकेतील ग्रह स्थितीवरुन सांगता येऊ शकते.

संतती सुख

संतती सुखामध्ये दोन गोष्टी प्रामुख्याने येतात. एक म्हणजे संतती प्राप्तीचे सुख आणि दुसरे म्हणजे संततीपासून मिळणारे सुख होय. आयुष्याचा व्यवस्थित विचार केल्यास या दोन्ही खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

कर्ज

काहींचे संपूर्ण आयुष्य कर्ज फेडण्यातच वाया जात असते. हे पत्रिकेतील बिघडलेल्या ग्रहस्थितीमुळे घडते. कर्जाच्या फेऱ्यामध्ये जो व्यक्ती एकदा अडकतो तो त्यातून लवकर बाहेर निघु शकत नाहीत.

परदेश गमन योग

प्रदेशात जाण्याची संपूर्ण तयारी केल्यानंतरही काही लोकांना कुठल्या ना कुठल्या कारणाने विमानतळावरुन परत यावे लागते. तर काही लोकांना ध्यानी मनी नसतांनाही, जवळ पुरेसा पैसा नसतांनाही परदेशगमन घडू शकते. हे पत्रिकेतील ग्रह स्थितीवरुन स्पष्ट होऊ शकते.

नविनतम महितीपूर्ण लेख

एक पत्रिका अशीही - नटसम्राट नव्हे सम्राज्ञी

मनुष्याला नेहमी इतरांच्या आयुष्याकडे पाहून अंदाज बांधण्याची सवय असते. ही सवय कळन-नकळत आपल्याला तुलना करायला लावते. आजच्या जगामध्ये

एक पत्रिका अशीही - काळ थांबत नसतोच...

नमस्कार! ज्योतिषशास्त्र मानणाऱ्या आणि त्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचं मी सौ. ज्योती जोशी मनःपूर्वक स्वागत करते. मला आनंद आहे, की आपण ज्या

एक पत्रिका अशीही - नियती आपली रोज परिक्षा घेते...

नमस्कार! ज्योतिषशास्त्र मानणाऱ्या आणि त्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचं मी सौ. ज्योती जोशी मनःपूर्वक स्वागत करते. आज मी तुमच्याशी अशा

डॉ ज्योती जोशी लिखित सर्व पुस्तके Amazon वर उपलब्ध

error: Content is protected !!