Skip to content

वास्तुयोगासाठी ज्योतिषशास्त्र

वास्तुयोगासाठी ज्योतिषशास्त्र

जीवनात अशा काही गोष्टी आतात की,  ज्या पूर्ण झाल्यामुळे मनुष्याला आपल्या जीवनाचे सार्थक झाल्याचे वाटते. त्यापैकी एक असलेली गोष्ट म्हणजे स्वतःची वास्तु होय. ज्योतिषशास्त्रानुसार जातकाच्या पत्रिकेमध्ये विविध योग जुळून येत असतात. हे योग शुभ आणि अशुभ अशा दोन्ही प्रकारे असतात. त्यासाठी विशिष्ट अशी ग्रह स्थिती कारणीभूत असते. आयुष्यातील वास्तुसुख सुद्धा यातून सुटलेले नाही. आयुष्यातील इतर सुखांबरोबर वास्तुसुखासाठी सुद्धा आपल्या पत्रिकेतील ग्रहच कारणीभुत असतात. ज्यांच्या पत्रिकेत वास्तु योग असतो त्यांनाच स्वतःच्या वास्तुचे सुख प्राप्त होत असते. वास्तुसुखाचा संबंध सरळ आपल्या भाग्याशी असतो. अशी वास्तु बनवित असतांना जमीन विकत घेण्यापासून तर त्यावर मनासारखी वास्तु बांधण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या पत्रिकेमध्ये विशेष अशी ग्रह स्थिती असावी लागते. ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील वास्तुसुख किंवा वास्तुयोग हा चतुर्थ स्थानावरुन बघितला जातो. त्यानंतर चंद्र, गुरु आणि शुक्र यांचे पत्रिकेतील स्थान व त्यांची शुभ – अशुभता आणि बळ या सर्वांचा विचार करावा लागतो. वास्तुचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वसाधारण व्यक्ती आपल्या आयुष्याची जमापूंजी खर्च करीत असतो. त्यामुळे वास्तु घेण्याच्या आधी आपली पत्रिका ज्योतिष तज्ज्ञांना आवर्जुन दाखवायला हवी. तसेच पत्रिकेत वास्तुयोग केव्हा आहे, वास्तुयोग केव्हा प्राप्त होऊ शकतो, हे सुद्धा जातकाच्या पत्रिकेवरुन सांगितले जाऊ शकते.

आपल्या पत्रिकेतील वास्तुयोग किंवा वास्तुसुख जाणून घेण्यासाठी एकदा अवश्य संपर्क साधावा.

 

ज्योतिष मार्ग दर्शनासाठी खालील पद्धतीने संपर्क करावा

[wpforms id="149"]
error: Content is protected !!